अयोध्या ज्वेलर्स

 

1990 सालापासुन अयोध्या ज्वेलर्स हे नाव सोने, चांदी व्यवसायात कार्यरत आहे. वर्षागणीक विस्तार वाढत गेला आणि 2006 साली विठुरायाच्या पंढरीत अयोध्या ज्वेलर्स ची सुरुवात झाली. 30 वर्षांची सुवर्ण परंपरा लाभलेल्या अयोध्या ज्वेलर्स मध्ये आज सोने, चांदीच्या दागिन्यांबरोबर, राशीरत्ने, गोल्ड फॉर्मिंग, पेशवाई दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच गोल्ड फायनान्स सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय ऑर्डर प्रमाणे हीरे व प्लॅटिनमचे देखील दागिने बनवून दिले जातात. 

पंढरपुरातील मध्यवर्ती भागात आमचे अद्ययावत वातानुकूलित दालन आहे. कलाकुसरी साठी कुशल कारागीर तसेच तत्पर विक्री पश्चात सेवा यांसाठी अयोध्या ज्वेलर्स ओळखले जाते. येथील सर्व दागिने हॉलमार्क मध्ये उपलब्ध आहेत. या आणि अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे गुणवत्तेसाठी दिला जाणारा ‘सकाळ’ चा Excellence Award देखील आम्ही पटकावला आहे.

ग्राहकांच्या पसंतीस उतरणार्‍या आधुनिक नक्षीकामाबरोबरच चोखंदळ ग्राहकांसाठी Antique ज्वेलरी चे देखील उत्तम नमुने येथे उपलब्ध आहेत. पारंपारिक कलाकृती आणि आधुनिकतेचा सुवर्णसंगम घडवून आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, आणि वेळोवेळी मिळणारा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद हीच त्या प्रयत्नांची पावती आहे. अयोध्या ज्वेलर्स मध्ये सोने व चांदीचा दर शुद्धतेनुसार ठरवला जातो. सोने बदलताना वजनाला वजन दिले जाते तसेच मोडीला देखील कॅरेट नुसार दर दिला जातो. ग्राहकांचे समाधान, माफक दर आणि दागिन्यांची शुद्धता या मापदंडांच्या पुर्ततेमुळे अयोध्या ज्वेलर्स नेहमीच ग्राहकांची पहिली पसंत ठरले आहे. 

या व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात देखील अयोध्या ज्वेलर्सचे योगदान राहिले आहे. समाजात स्त्रीयांचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही हिरकणी योजनेसारखे उपक्रम राबविले आहेत.

तेव्हा, कुठल्याही शुभ कार्याच्या दागिने खरेदीसाठी अयोध्या ज्वेलर्सला भेट द्यायला विसरू नका. ग्राहकांच्या सदिच्छा व आशीर्वादाने हा प्रवास असाच उत्तरोत्तर समृद्ध होत जावो हीच प्रार्थना.

 

Ayodhya Jewellers

Founded in 1990, Ayodhya Jewellers has been one of the prominent names in the business of gold and silver ornaments. This tradition of 30 long years has grown by every passing year and in 2006 we started our journey in Pandharpur. At present, along with gold and silver jewellery we also have a wide variety of Astrological gemstones, Gold Forming, and Peshwai Jewellery. Also, We deliver Diamond and Platinum jewellery as per your requirement. We offer services like Gold Finance as well.

Equipped with modern facilities and located in the heart of the city, our space has an infinite variety of jewellery designs. We have skilled labour for artistic and attractive creations. Also, all our ornaments and jewellery is available in hallmark. Qualities like these have added a lot of feathers of honor in our cap, including one of the most prestigious ‘Excellence Award’ by ‘Sakal’ group.

Along with the much appreciated modern jewellery, we also offer a great collection of ‘Antique’ ornaments for our customers. This balance between modern and traditional art is what we always strive for and our customer’s amazing response has always indicated that we are thriving in it.

We, in Ayodhya Jewellers, determine the price of our jewellery according to the purity of the gold or silver. Your ornaments while being exchanged also go through the precise weighing tests. We also determine our prices according to the carat of the gold.

Thanks to our policy of emphasizing on Customer Satisfaction, Prompt After Sales Service, The Purity of the Gold and Silver, Ayodhya Jewellers has always been the first choice of customers for jewellery shopping.

Along with this business, we have also been active in many social causes. To encourage Girl birth, education, and empowerment, we have implemented schemes like ‘Hirkani Yojana’.

Do visit Ayodhya Jewellers for any of your jewellery needs. We intend to serve you with all our heart. With your best wishes and blessings, we hope for a prosperous and fulfilling journey ahead.

Item added to cart.
0 items - 0.00